Posts

Showing posts from April 19, 2020

सामान्य रुग्णालय,उदगीर च्या दैनंदिन रुग्णसेवेचे धन्वंतरी आयुर्वेद कॉलेज येथे स्थलांतर

सामान्य रुग्णालय,उदगीर च्या दैनंदिन रुग्णसेवेचे धन्वंतरी आयुर्वेद कॉलेज येथे स्थलांतर    उदगीर(संगम पटवारी):कोवीड-19(कोरोना विषाणू संसर्ग)या आजाराच्या पार्श्वभूमीवर सामान्य रुग्णालय, उदगीर येथे संपूर्णतः डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटल निर्माण करण्यात आलेले आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग,लातूर यांच्या सुचनेप्रमाणे सामान्य रुग्णालय उदगीर येथील सर्व दैनंदिन रुग्णसेवेचे स्थलांतर धन्वंतरी आयुर्वेद मेडिकल अॅन्ड चॅरिटेबल हाॅस्पीटल,श्रीकृष्ण मंदीरासमोर,देगलुर रोड,उदगीर,जि.लातूर येथे करण्यात आले आहे.     तरी सर्व जनतेस कळविण्यात येते की पुढील आदेशापर्यंत उदगीर व परिसरातील सर्व नागरिकांच्या विविध आजाराची व आरोग्य विषयक समस्यांची तपासणी व आवश्यकतेनुसार उपचार-शस्रक्रिया,गरोदर स्त्रियांची प्रसंगी, प्रसुतीपश्चात उपचार-मार्गदर्शन, अपघातामुळे निर्माण होणाऱ्या आजाराचे निदान व उपचार व तसेच रक्त, व लघवी तपासण्या, सोनोग्राफी, एक्स-रे ई.सी.जी. तपासणी धन्वंतरी आयुर्वेद मेडिकल कॉलेज उदगीर येथे होणार आहेत.    रुग्णांना त्वरीत सेवा व उपचार मिळा...

*वसंतनगर तांड्यावर पोलिसांची धाड, 30000  मुद्देमाल,लाखाचा रसायन नष्ट*....

Image
  प्रतिनिधी / शरद राठोड     लातुर तालुक्यातील मौजे वसंतनगर तांडा येथे गातेगांव पोलिसांनी टाकलेल्या धाडीत एकुण 30000 हजार रूपयांचा मुद्देमाल व रसायनमिश्रीत पावडर सहित जवळपास एक लाखाचा ऐवज जागीच नष्ट केला आहे.   मागील कित्येक दिवसांपासून वसंतनगर तांड्यावर हातभट्टी नावाची गावटी दारू राजरोसपणे विकत असल्याची माहिती गातेगांव पोलिसांना मिळाली.याबाबत संबंधित बिट अंमलदार व सहायक पोलीस निरीक्षक यांनी त्या विक्रेत्यास चांगलीचं समज दिली होती.त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या आजारामुळे प्रशासनाकडुन विविध ऊपाययोजना राबविण्यात येत आहेत.त्यामुळे आधीच वाढलेली नागरिकांची जबाबदारी त्यात दारू माफियाचा सर्रास चालणार खेळ यांसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक आमोल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एक टिम नेमण्यात आली.या टिमने योग्य वेळ पाहता मागील आठवड्याभरातुन वसंतनगर तांड्यावर धाडी टाकल्या.या धाडीत त्यांना वसंतनगर तांड्यातील घरासमोर,ऊसामध्ये,तुराट्यात विविध ठिकाणी ठेवलेल्या व जमिनीत काही पुरुन ठेवलेल्या पिवळसर रसायन नष्ट करण्यात आले.यामध्ये एकचण 250 लिटर हातभट्टी जप्त करण्यात आली.शिवाय त्यासाठी लागणा...

कळमनुरीत ७०० कुटुंबांना घरपोच अन्नधान्य व किराणा साहित्य वाटप

Image
  नगरसेवक निहाल कुरैशी यांचा पुढाकार   कळमनुरी - देशात कोरोना व्हायरस च्या पार्शवभुमीवर गेल्या अनेक दिवसा पासुन शासना तर्फे लाऊकडाऊन करण्यात आले आहे. अश्या परिसथितीत गोर गरीब लोकांंचे व मजुरांचे जिवन आर्थिक संकटात सापडले आहे.अश्या परिस्थितीत शहरातील गरजू लोकांसाठी  नगर सेवक निहाल कुरैशी यांच्या पुढाकारातून रविवारी  सातशे कुटुंबाना  अन्न धान्य व अत्यावाश्यक साहित्य वाटप करण्यात आले.    कोरोना विषानुच्या प्रसार रोखण्यासाठि गेल्या अनेक दिवसा  पासुन लॉकडाऊन  व संचारबंदी  असल्याने  हातावर पोट असणाऱ्या नागरिकांवर उपसमारीची वेळ आली आहे. संचार बंदीच्या काळात कोणीही उपाशी राहू नये यासाठी शहरातील दानशूर व्यक्ती कडून मदतीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे अन्न छत्राच्या मदतीने पालवारील गरजू नागरिकांना साहित्य व जेवणाचे डबे पुरविले जात आहेत.   कळमनुरी शहरात ही नगरसेवक निहाल कुरैशी यांनी तब्बल ७०० कुटुंबांचा उदरनिर्वाह व्हावा म्हणून आवश्यक सामान वाटप केले. यात  गहू, तांदुळ, खाद्यतेल, साबन आदी वस्तूंचा  समावेश आहे. नगरसेवक निहाल कुरैशी...

आरबीआयने नि‍श्चत केलेल्या वेळापत्रकानुसार आजपासून बँकाचे कामकाज सुरु राहणार

Image
आरबीआयने नि‍श्चत केलेल्या वेळापत्रकानुसार आजपासून बँकाचे कामकाज सुरु राहणार वस्तू, माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना आजपासुन लॉकडाऊनमधुन सुट हिंगोली, दि.19:  जागतिक आरोग्य संघटनेने करोना (कोव्हीड-19) या विषाणुमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणुन घोषीत केलेला आहे. तसेच कोरोना विषाणुचा प्रसार भारतात, महाराष्ट्रातील शहरात गतीने पसरत आहे. राज्य शासनाने करोनाचा प्रादुर्भाव प्रतिबंधासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13 मार्च, 2020 कायद्यातील खंड 2, 3 व 4 मधील तरतुदी नुसार अधिसुचना निर्गमीत  केली आहे.  त्याबाबतची  नियमावली देखील तयार करण्यात आली आहे. तसेच भारत सरकार आरोग्य मंत्रालय महाराष्ट्र शासन आरोग्य मंत्रालयाने जाहीर  केल्याप्रमाणे करोनाग्रस्त रुग्णाचे इतर लोकांनी संपर्कात येवू नये. तसेच सार्वजनिक किंवा खाजगी ठिकाणी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे इत्यादी बाबीमुळे या विषाणुचा संसर्ग व प्रादूर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेवून सर्व सामान्य जनतेच्या आरोग्यास धोका होवू नये याकरीता फौजदारी दंड प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मन...

जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या प्रमाण पत्राशिवाय बाहेर जिल्ह्यात नो एंट्री

Image
जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या प्रमाण पत्राशिवाय बाहेर जिल्ह्यात नो एंट्री    केवळ वैद्यकीय कारणासाठी काढले आदेश, तीनच व्यक्तींना जाता येणार   वसमत - जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन संचारबंदी कायदा लागू असल्याने बाहेर वैद्यकीय कारणासाठी जावयाचे असल्यास जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या प्रमाण पत्राशिवाय जाता येणार नाही .असे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काढले असून केवळ अटी व शर्थीच्या नियमानुसार वाहनचालक व इतर दोघांना दिलेल्या ठिकानाशिवाय इतरत्र जाता येणार नाही.   राज्य शासनाने कारोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथिचा रोग प्रतिबंधात्मक कायदा - 1897  १३मार्च पासुन जिल्ह्यात  लागु केला आहे. त्यानुसार  जिल्हाधिकारी जयवंशी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात (कोव्हीड-19) नियंत्रणात आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपयोजना करणे आवश्यक आहे. त्या करण्यासाठी सक्षम अधिकारी म्हणुन उपविभागीय अधिकारी यांची नियुक्ती केली आहे.      देशांतर्गत , राज्याअंतर्गंत , जिल्हयातंर्गंत नागरीक विविध कारणास्तव प्रवास करीत अस...

माळधावंडा, पाणबुडे वस्‍ती येथे पाण्याचे टँकर सुरू करा

Image
  जिल्‍हा परिषद सदस्य डॉ. सतीश पाचपुते यांची मागणी   हिंगोली -  एकीकडे कोरोनाचे संकट सुरू असताना काही गावात पाणी टंचाईचा सामना गावकऱ्यांना करावा लागत आहे. कळमुनरी तालुक्‍यातील माळधावंडा व पाणबुडे वस्‍ती (खापरखेडा) येथे पाणी टंचाई निर्माण झाल्याने या गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू करावी अशी मागणी जिल्‍हा परिषद सदस्य डॉ. सतीश पाचपुते यांनी उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांच्याकडे केली आहे.    सध्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन, संचारबंदी, जमावबंदी सुरू आहे. शहरासह ग्रामीण भागात देखील त्‍याचे पालन गावकरी करीत आहेत. मात्र काही गावात पाणी टंचाईचे संकट ग्रामस्‍थासमोर उभे आहे. गावातील विहीरीची पाणी पातळी खोलवर गेल्याने शेतशिवारातील विहीरीवर जावून पाणी आणवे लागत आहेत. कळमनुरी तालुक्‍यातील माळधावंडा व पाणबुडे वस्‍ती (खापरेखडा) येथे तीवृ पाणी टंचाई निर्माण झाली आहे. माळधावंडा येथील गावकऱ्यांना गावात पाणी टंचाईमुळे बोथी येथून न्यावे लागत आहेत. हे पाणी नेताना सोशल डिस्‍टन्स पाळणे येथे शक्‍य होत नाही दऱ्या खोऱ्यात असलेल्या विहीरीवर जावून पाणी आणावे लागत आहे.  ...

कोरोना योध्दांना दररोज पुरविला जातोय नास्‍ता  हिंगोली अर्बन ट्रस्‍टचा उपक्रम

कोरोना योध्दांना दररोज पुरविला जातोय नास्‍ता    हिंगोली अर्बन ट्रस्‍टचा उपक्रम   हिंगोली -  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू असल्याने यासाठी शहरात कर्तव्यावर काम करणारे पोलिस कर्मचारी, जवान, आरोग्य कर्मचारी यांना हिंगोली अर्बन ट्रस्‍टतर्फे दररोज सकाळी नास्‍ता दिला जात आहे. त्‍याचे वाटप हे काम करणारे योध्दे जेथे आहेत त्‍याठिकाणी त्‍यांना तो दिला जात आहे.    कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन, संचारबंदी, जमावबंदी सुरू आहे. तसेच बाजारा गर्दी होणार नाही यासाठी पोलिस प्रशासनाने जागोजागी बंदोबस्‍त लावला आहे. आरोग्य कर्मचारी देखील यात रात्रंदिवस काम करीत आहेत. त्‍यांना सकाळ ते सायंकाळ कर्तव्यावरच राहावे लागत असल्याने वेळवेर जेवण नास्‍ता मिळणे कठीण आहे. यासाठी अन्नदानात नेहमी पुढाकार घेणारे हिंगोली अर्बन ट्रस्‍टचे जयेश खर्जुले यांनी पुढाकार घेत मागच्या दहा ते पंधरा दिवसापासून कोरोना योध्दांसाठी जागेवरच नास्‍त्‍याची व्यवस्‍था केली आहे.    हिंगोली अर्बन ट्रस्‍टमधील कार्यकर्ते यासाठी पुढाकार घेत आहेत. दररोज दिल्या जाणाऱ्या नास्‍त्‍यात पो...

आजपासून जीवनावश्यक वस्तूंची दूकाने दररोज सुरु राहणार

आजपासून जीवनावश्यक वस्तूंची दूकाने दररोज सुरु राहणार   हिंगोली, दि.19:  जागतिक आरोग्य संघटनेने करोना (कोव्हीड-19) या विषाणुमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणुन घोषीत केलेला आहे. तसेच कोरोना विषाणुचा प्रसार भारतात, महाराष्ट्रातील शहरात गतीने पसरत आहे. राज्य शासनाने करोनाचा प्रादुर्भाव प्रतिबंधासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13 मार्च, 2020 कायद्यातील खंड 2, 3 व 4 मधील तरतुदी नुसार अधिसुचना निर्गमीत  केली आहे.  त्याबाबतची  नियमावली देखील तयार करण्यात आली आहे. तसेच भारत सरकार आरोग्य मंत्रालय महाराष्ट्र शासन आरोग्य मंत्रालयाने जाहीर  केल्याप्रमाणे करोनाग्रस्त रुग्णाचे इतर लोकांनी संपर्कात येवू नये. तसेच सार्वजनिक किंवा खाजगी ठिकाणी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे इत्यादी बाबीमुळे या विषाणुचा संसर्ग व प्रादूर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेवून सर्व सामान्य जनतेच्या आरोग्यास धोका होवू नये याकरीता फौजदारी दंड प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेशान्वये संपूर्ण जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू झाल्याचे जाहिर करण्यात आले...