कोरोनाच्या धास्तीने बियर, विदेशी दारू दुकानाला नकार
कोरोनाच्या धास्तीने बियर, विदेशी दारू दुकानाला नकार जिल्हाधिकारी जयवंशी यांनी काढले आदेश हिंगोली - जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णाची संख्या ५२ वर गेल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जिल्हाधिकारी जयवंशी यांनी देशी, विदेशी, बियर शॉपी सुरु करण्यासाठी बंदी असल्याचे आदेश सोमवारी काढले आहेत. त्यामुळे तळी रामांची मात्र चांगलीच गैरसोय होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली चाळीस दिवसापासून जिल्ह्यात लॉकडाऊन ,संचारबंदी कायदा लागू आहे. मात्र अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसाय पूर्णपणे बंद आहेत. आतापर्यन्त दोन लॉक डाऊन झाले. पहिला२१ तर दुसरा १९दिवसाचा होता. आता तिसऱ्या टप्याला सोमवार पासून सुरु झाली आहे.जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढल्याने मागील पाच दिवस सर्व व्यवहार आस्थापना पूर्ण बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जयवंशी यांनी दिले होते. त्यानुसार सोमवार पासून अत्यावश्यक सेवा सुरु करण्यात आली. केंद्र शासनाने ,राज्य शासनाने तीन मे पासून रेड झोन वगळता ऑरेंज व ग्रीन झोन मधील बियर शॉपी, देशी, विदेशी दारू विक्री व्यवसायाला परवानगी दिली असून जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी ...