आ. अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून साकारली मराठवाड्यातील पहिली रेशीम परिषद
रेशीम उद्योगाचे केंद्र म्हणून औसा देशात ओळखले जावे-आ. पवार औसा /प्रतिनिधी :लातूर जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे . उसाला अधिक पाणी लागते .त्याऐवजी रेशीम शेती केली तर कमी पाण्यात अधिक उत्पन्न मिळू शकते . आपण औसा परिसरात रेशीम लागवडीसाठी पुढाकार घेतला आहे . भविष्यात औसा हे रेशीम उद्योगचे केंद्र म्हणून देशात ओळखले जावे, अशी अपेक्षा व्यक्त करित लवकरच लातूर जिल्हा रेशीम उत्पादक संघाची स्थापना करणार असल्याचे अभिमन्यू पवार यांनी सांगितले . आ.पवार यांच्या संकल्पनेतून औसा येथे मराठवाड्यातील पहिली रेशीम परिषद संपन्न झाली . या परिषदेत आ.पवार बोलत होते . या परिषदेच्या अध्यक्षस्थानी रेशीम विभागाचे औरंगाबाद विभागाचे उपसंचालक डी ए हाके , रेशीम तज्ञ डॉ.एल बी कलंत्री , अधिकराव जाधव , चॉकी तज्ञ विजय पाटील यांच्यासह तहसीलदार सौ.पुजारी , तालुका कृषी अधिकारी मोरे , निलंगा तालुका कृषी अधिकारी नांदे , रेशीम अधिकारी शिंदे , जिल्हा रेशीम अधिकारी बावगे , मांजरा कृषिव विज्ञान केंद्राचे देशमुख , येथील बालाजी पवार , शिवाजीराव भोसले , भीमाशंकर राचट्टे,अरविंद कुलकर्णी , सु...