जि.प. परिसरात मास्क शिवाय कोणी आढळून आल्यास दंडात्मक कारवाई
जि.प. परिसरात मास्क शिवाय कोणी आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करणार - सीईओ राधा बिनोद शर्मा हिंगोली - कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी जीप कर्मचारी असोत किंवा कार्यालयीन कामासाठी येणारे अभ्यागत यांनी मास्क न वापरल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे सीईओ राधा बिनोद शर्मा यांनी सोमवारी (ता.१८) बैठकीत दिला आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ राधा बिनोद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी विभाग प्रमुखांची बैठक सोशल डिस्टन्स पाळत घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी , अतिरिक्त सीईओ डॉ. मिलिंद पोहरे, महिला बाल कल्याण विभागाचे डेप्युटी सीईओ गणेश वाघ,पाणी व स्वछता विभागाचे आत्माराम बोन्द्रे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, नितीन दाताळ ,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे जयराम मोडके,ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत वाघमारे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश वायचाळकर ,माध्यमिक शिक्षणाधिकारी पी. बी. पावसे,प्राथमिक शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, आदींची उपस्थिती होती. कोरोनाच्या प...