हिंगोलीकराना दिलासा ; पुन्हा १८ एसआरपीएफ जवान कोरोनामुक्त
हिंगोलीकराना दिलासा ; पुन्हा १८ एसआरपीएफ जवान कोरोनामुक्त जिल्ह्याची ग्रीन झोनकडे वाटचाल हिंगोली - मालेगाव, मुंबई येथून बंदोबस्तवरून परतलेल्या ९१ कोरोना बाधित रुग्णापैकी मंगळवारी (ता.१२)जवान कोरोनामुक्त झाल्याने आता सुमारे ३८ रुग्ण बरे होऊन सुट्टी मिळाल्याने जिल्ह्याची वाटचाल ग्रीन झोनकडे होत आहे. त्यामुळे कोरोना बाधितांच्या आकडेवारीत पॉझिटिव्ह चे निगेटिव्ह मध्ये रूपांतर होत असल्याने जिल्हा प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसांपूर्वी कोरोना बाधित रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली होती.कोरोना बाधितांचा आकडा शंभरी पार करते की काय अशी भीती आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाला लागली होती .मात्र जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी वेळीच तातडीने आरोग्य यंत्रणेच्या बैठका घेत त्यांचा चांगला समाचार घेत रुग्णाकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याच्या सूचना दिल्या होत्या. जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डातील उपचार घेत असलेल्या १८जवानांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने १८ जवानांना सुट्टी द...