Posts

Showing posts from August 1, 2020

आजचे नवे पॉझीटीव्ह 188 आजचे मृत्यू 05

Image
लातूर कोरोना अपडेट ------ आजचे नवे पॉझीटीव्ह 119 तर 69 रॅपिड टेस्टचे एकूण 188 आजचे मृत्यू 05 -------  आजपर्यंतचे एकूण रुग्ण 2311 सध्या उपचार सुरू असलेले 927   आजपर्यंत बरे झालेले 1284  एकूण मृत्यू  100 डिटेल नंतर मिळतील 

हिंगोलीत भाजपाचे दूध आंदोलन आमदार मुटकुळे सह वीस कार्यकर्त्यांना अटक करून सोडून दिले

Image
हिंगोलीत भाजपाचे दूध आंदोलन आमदार मुटकुळे सह वीस कार्यकर्त्यांना अटक करून सोडून दिले हिंगोली - गाईच्या दुधाला सरसकट दहा रुपये लिटर तर दूध पावडरला प्रति लिटर ५०रुपये अनुदान द्यावे आशा विविध मागण्यासाठी भाजपने हिंगोली सह तालुका पातळीवर  शनिवारी दूध आंदोलन केले. यावेळी आमदार तानाजी मुटकुळे सह वीस ते२५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून शहर पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर त्यांची अर्ध्या तासानंतर सुटका केली. भाजपने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत राज्यभर दूध एल्गार आंदोलन करण्यात आले. त्यानुसार शनिवारी (ता.१) सकाळी दहाच्या सुमारास भाजप आमदार तानाजी मुटकुळे  यांच्या नेतृत्वाखाली शहरातील नांदेड नाका परिसरातील अग्रसेन चौकात महाविकास आघाडी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत ,हातात भाजपचे कमळ असलेले झेंडे, फलक दूध आंदोलन सुरू केले. त्यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. या आंदोलनात ऍड. के.के. शिंदे, रिपाइंचे दिवाकर माने, फुलाजी शिंदे, संतोष टेकाळे, संजय ढोके, श्याम खंडेलवाल, हमीद प्यारेवाले, उमेश नागरे, अमोल जाधव, डॉ. वसंतराव देशमुख ,प्रशांत सोनी, महिला आघाडी जिल्हाध्य...