जिल्हा कचेरीत दिशा समितीची बैठक, खासदार पाटील यांचे जिल्हाधिकारी यांना आदेश
बैठकीला गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा जिल्हा कचेरीत दिशा समितीची बैठक, खासदार पाटील यांचे जिल्हाधिकारी यांना आदेश हिंगोली - दिशा समितीच्या बैठकीत गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करून कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश खासदार हेमंत पाटील यांनी गुरुवारी (ता.२७) जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना दिले. येथील जिल्हा कचेरीच्या डिपीसी सभागृहात गुरुवारी दिशा समितीची बैठक खासदार हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी ,जिल्हा नियोजन अधिकारी गिरगावकार ,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गनाजी बेले, जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. एच.पी.तुमोड,उप मुख्य कार्यकारी अधिकारी, धनवंतकुमार माळी,आदींची उपस्थिती होती.पूर्वी दक्षता सनियंत्रण समिती होती. त्याचे आता नामकरण दिशा असे झाले असल्याचे सांगून यावेळी खासदार पाटील यांनी केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या ४२ योजनेच्या माध्यमातून जिल्हाभरात कामे सुरू असून, या योजनेचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थीना मिळतो का नाही याचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीचे आयोजन जिल्हा परिषद व नियोजन विभागाकडून केले...