ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा
ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा
हिंगोली - येथील ओमप्रकाश देवडा पीपल्स को. ऑप. बँकेला मागील आर्थिक वर्षात ३.१५ कोटीचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती सुनील देवडा यांनी ऑनलाइन झालेल्या बँकेच्या सर्वसाधारण सभेत संचालकांना दिली.
मंगळवारी बँकेचे अध्यक्ष सुनील देवडा यांच्या अध्यक्षतेखाली (ता.२२) सर्व साधारण सभा पार पडली. यावेळी उपाध्यक्ष प्रकाश सोनी,संचालक विठ्ठलदास धनावत ,नरेंद्र मोदी, नरेंद्र अग्रवाल,प्रकाश गोयल,बजरंगलाल अग्रवाल ,डॉ. हंसादेवी बगडीया ,सुभद्रादेवी मंत्री,ज्ञानेश्वर मामडे,शशिकांत दोडल,राजेंद्र
निमोदिया ,गजानन देशमुख,आशिष काबरा,विजय अग्रवाल,राजेश अग्रवाल,राजू मुदिराज,एम. एम. बुद्रुक, राजेश कयाल ,बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर जोशी,सहाय्यक व्यवस्थापक संजय राजेश्वर , दिलीप देशपांडे,कंदी आदींची उपस्थिती होती. यावेळी नोटीसीचे वाचन करण्यात आले.
ओमप्रकाश देवडा पीपल बँकेचा आलेख अध्यक्ष सुनील देवडा यांच्या अध्यक्षतेखाली दिवसेंदिवस वाढत असून बँकेची वाटचाल प्रगतीकडे चालू आहे. दरम्यान, मंगळवारी बँकेत ३८वि वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे बोलावण्यात आली.प्रारंभी बँकेचे दिवंगत संचालक रुपचंद बज,रामप्रकाश देवडा, व परभणी बँकेचेसल्लागार नंदकिशोर अग्रवाल यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.बँकेच्या सर्वसाधारण सभेत ७८ टक्के सभासदानी मतदानाचा हक्क बजावून बँकेवर विश्वास दाखविल्या बद्दल सर्वांचे आभार मानले.
ऑनलाईन सभेत २०१८-१९ मध्ये बँकेचे ऑडिट झाले होते त्याचा वार्षिक अहवाल प्राप्त झाला असून मुंबईच्या ऑडिटर यांनी बँक्स अ ग्रेड दिला आहे. आजघडीला बँकेकडे १९ हजार २५६ सभासद असून १६.१३भागभांडवल असल्याचे सांगून वर्षा अखेरीस ६७५ कोटीच्या ठेवी असून,३७५ कोटीचे कर्ज आहे.बँकेचा ग्रॉस एनपीए ७.०३ टक्के एवढा आहे.तर नेट एनपीए १.३५ टक्के आहे.तसेच सरकारी रोख्यातील गुंतवणूक १९७ कोटी असून ८४.१२ कोटी हा राखीव ठेवण्यात आला आहे.तर बँकेला ३.१५कोटीचा निव्वळ नफा झाला असल्याचे सुनील देवडा यांनी सांगितले.आता ग्राहकांना सुलभ सेवा देण्यासाठी लवकरच मोबाईल बँकेची सुविधा सुरु केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.