दहा हजाराची लाच घेताना जमादार एसीबीच्या जाळ्यात







दहा हजाराची लाच घेताना जमादार एसीबीच्या जाळ्यात

 

हिंगोली -  तालुक्‍यातील मालसेलू येथील जागेचा जुना वाद मिटविण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या बिट जमादारास एसीबीच्या पथकाने रविवारी (ता.24) रंगेहात पकडले. 

 

हिंगोली तालुक्यातील मालसेलू येथे अनेक वर्षांपासून जागेचा वाद आहे. हा वाद कोर्टात सुरू असून, या जागेत 

अतिक्रमण करण्यात आलेले आहे. हे अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रारदाराने तक्रार 

दिली होती. त्यानुसार बिट जमादार नंदकिशोर मस्के यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. नंतर अतिक्रमण हटवून देण्यासाठी 25 हजार रुपयांची मागणी केली होती.  

मात्र तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने, त्याने थेट लाचलुचपत कार्यालय गाठून बिट जमादाराविरुध्द 

तक्रार दाखल केली. त्‍यानंतर त्‍याची पडताळणी करण्यात आली होती. 

 

त्यानुसार लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक हनुमंत गायकवाड, पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, पोलिस निरीक्षक ममता अफुणे व इतर कर्मचाऱ्याच्या पथकाने रविवारी माळसेलु परिसरातील शेतशिवारात सापळा रचला होता. 10 हजार रुपये स्वीकारताना बीट जमादार नंदकिशोर मस्‍के याला रंगेहात पकडले. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात  रात्री उशीरापर्यत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.


 

 



 



 















ReplyForward







Popular posts from this blog

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा