बाळापूरात कोरोनाच्या खबरदारासाठी बाजारपेठ बंद 

बाळापूरात कोरोनाच्या खबरदारासाठी बाजारपेठ बंद 

 

आखाडा बाळापूर -  येथे मंगळवारी (ता.17) भरणारा आठवडी बाजार कोरोनाच्या खबरदारीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे आदेश जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत. 

 

या बाबत जिल्‍हाधिकारी यांनी एका पत्रकाद्वारे माहिती दिली आहे की. बाळापूर येथे दर मंगळवार भरणाऱ्या बाजारात सर्व प्रकारची दुकाने लावणार्या व्यापाऱ्यांनी तसेच बाजार ला येणाऱ्या सर्व नागरीकांना कळविण्यात येते की,भारत देशात व राज्यात पसरणाऱ्या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी होणाऱ्या कार्यक्रम व ठीकाणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बाळापूर येथे दर मंगळवार आठवडी बाजार भरतो.यामुळे या ठीकाणी शहरात गर्दी होते. शहरातील व बाहेर गावाहून आलेली असंख्य नागरीक एकत्र येतात हे टाळण्यासाठी आठवडी बाजार बंद ठेवणे आवश्यक झाले आहे.

 

 

त्‍यामुळे मंगळवारी (ता.17) भरणारा आठवडी बाजार बंद ठेवण्यात येत आहे.यामुळे आठवडी बाजारात सर्व प्रकारची दुकाने लावणाऱ्या व्यापाऱ्यांनी व नागरीकांनी या बाबतची नोंद घ्यावी. असे आवाहान पोलीस निरीक्षक विकास थोरात यांनी केले आहे.

Popular posts from this blog

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा