सोनपेठात रोटरी क्लबकडून पोलीसांसाठी चहा-पाण्याची व्यवस्था



राहूट्यामध्ये राहणार्‍या गरजूंना केले तांदूळाचे वाटप
सोनपेठ,दि.28(प्रतिनिधी) ः कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सध्या लॉकडाऊन आहे.त्यामुळे हॉटेल्स व दुकाने बंद आहेत. नागरीकांनी घराबाहेर पडू नये, गर्दी करु नये यासाठी पोलीसांची गस्त सुरु आहे. सोनपेठ शहरासह तालुक्यात गस्तीवर असणार्‍या अशा पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना रोटरी क्लबच्या वतीने चहा-पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
 गेल्या शनिवारपासून जिल्ह्यात लॉकडाऊन आहे, यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बद आहेत. सोनपेठ येथे सकाळी 7 ते 8 या वेळेत भाजीपाला विक्री होत आहे. त्यानंतर बंद करण्यात येत आहे. नागरीकांनी गर्दी करु नये, तसेच घराबाहेर पडू नये, असे आवाहन करत पोलीस अधिकारी  व कर्मचारी शहरासह तालुक्यात गस्त घालत आहेत.
गस्तीवर असणार्‍या या अधिकारी व कर्मचार्‍यांना पिण्याचे पाणी व चहा मिळावा यासाठी रोटरी क्लबने पुढाकार घेतला आहे. सोनपेठ येथील मोबाईल हॉटेल चालक राजेश गायकवाड यांच्या माध्यमातून ही व्यवस्था करण्यात आली आहे. कापड व्यापारी ज्ञानेश्‍वर डमढेरे यांनी पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना मास्कचे वाटप केले. तसेच रोटरी क्लबच्या वतीने सोनपेठ परिसरात राहूट्यामध्ये राहणार्‍या गरजू कुटूंबियांना तांदूळाचे वाटप केले आहे.  


Popular posts from this blog

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा