पाणी पुरवठा विहीरीच्या कामासाठी २५ एप्रीलची डेड लाईन हिंगोली पाणी टंचाईची बैठक

पाणी पुरवठा विहीरीच्या कामासाठी २५ एप्रीलची डेड लाईन

 

हिंगोली पाणी टंचाईची बैठक, आमदार मुटकुळे, बांगर यांची उपस्‍थिती

 

हिंगोली - महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतंर्गत तालुक्‍यात 130 सार्वजनिक पाणी पुरवठा विहीरीची कामे सुरू असून ही कामे तातडीने 25 एप्रील अखेर पुर्ण करण्याच्या सुचना आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी संबधीत अधिकाऱ्यांना मंगळवारी (ता.18) सुखदा मंगल कार्यालयात झालेल्या पाणी टंचाईच्या बैठकीत दिल्या. 

 

यावेळी आमदार मुटकुळे यांच्यासह आमदार संतोष बांगर, जिल्‍हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले, पंचायत समितीच्या सभापती लक्ष्मीबाई झुळझुळे, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, गटविकास अधीकारी डॉ. मिलींद पोहरे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत वाघमारे, मुकुंद कारेगावकर यांच्यासह पंचायत समिती, जिल्‍हा परिषद सदस्य विज वितरणचे अधिकारी यांची उपस्‍थिती होती. 

 

या बैठकीत मागील वर्षाचा पाणी टंचाईचा आढावा घेत चालु वर्षाच्या मंजूर आराखड्याचे वाचन करण्यात आले. यावेळी आमदार मुटमुळे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत मंजूर आराखड्याची तात्‍काळ अमंलबजावणी करण्याच्या सुचना दिल्या आज घडीला तालुक्‍यातील 111 गावात पाणी टंचाईच्या समस्या जाणवत नसल्याने सार्वजनिक पाणी पुरवठा विहीरीची अपुर्ण कामे तातडीने 25 एप्रील अखेर पुर्ण करण्याचा सुचना दिल्या. ज्या गावातील ग्रामस्‍थ विहीरीची कामे पुर्ण करणार नाहीत त्या गावांना पाणी टंचाईपासून दुर राहवे लागणार असल्याचा सच्चड इशारा आमदार मुटकुळे यांनी सरपंचाना दिला. 

 

 

यावेळी सरपंच संघटनेने विविध मागण्या संदर्भात आमदार तान्हाजी मुटकुळे यांना पाणी टंचाई बैठकीवर बहिष्कार टाकण्यात येत असल्याचे निवेदन दिले.

Popular posts from this blog

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा