शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

 

हिंगोली - सूर्यवंशी कुठे आहेत, असे विचारत अर्जावर शिक्का दे व मोबाईल नंबर देता का नाही असे म्हणत शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघांवर शहर पोलिसात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे.

 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येथील नगरपालिकेत कर्मचारी काम करीत असताना, आरोपी महमूद अमिरखान,फरहीन महेमुद राहणार रिसाला बाजार मोठी मस्जिद यांनी दुपारी तीन ते चारच्या सुमारास पालिकेत कोणता तरी अर्ज घेऊन आले होते. यावेळी या दोघांनी सूर्यवंशी कुठे आहेत ,असे म्हणून अर्जावर शिक्का दे, मोबाईल नंबर देता का नाही म्हणून शिवीगाळ करून त्या ठिकाणी पडलेला प्लायवूडचा तुकडा हातात घेत लिपिक शिवाजी घुगे (वय४३)यांच्या अंगावर उगारला असता तेवढ्यात शेख साजिद शेख दौलत याने त्याच्या हाताला धरून मारत असताना रोखल्याने हाणामारी ची घटना टळली.परंतु या दोघांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करून शासकीय कामात कर्तव्य पार पाडत असताना कर्तव्यात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोघांवर शहर पोलिसात शिवाजी उत्तरामराव घुगे यांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक शेख सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक केनेकर पुढील तपास करीत आहेत.

Popular posts from this blog

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा